महिलांना रोजगारासाठी पिंक (गुलाबी) ई रिक्षा योजनाMaharashtrd pink E Rickshaw yojana

महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करता यावे म्हणून तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक (गुलाबी) ई रिक्षा योजना घोषित करण्यात आली आहे

गुलाबी रिक्षा योजनेमध्ये राज्यातील 17 शहरांमध्ये 10.000 महिलांना गुलाबी रिक्षा खरेदीसाठी आर्थिक मदत मिळणार आहे

गुलाबी ई रिक्षा योजनेत कोणत्या शहरात किती रिक्षा मिळणार

शहरलाभार्थी संख्या
छत्रपती संभाजी नगर400
कोल्हापूर200
सोलापूर200
वसई. विरार400
डोंबिवली400
पनवेल300
चिंचवड 300
अमरावती400
पिंपरी400
नवी मुंबई500
कल्याण400
नागपूर1400
पुणे1400
मुंबई उपनगर1400
एकूण10.000

गुलाबी रिक्षा योजनेचा उद्देश

1. राज्यातील महिला आणि मुलींना सोईसुविधा आणि रोजगार निर्माण करण्यासाठी.

2. राज्यातील महिला आणि मुलींना सुरक्षित प्रवास करता यावा म्हणून.

3. महिलांनी मुलींना आर्थिक आणि सामाजिक प्रगती करण्यासाठी

4. गरजू महिलां आणि मुलींना आत्मनिर्भर करणे

योजनेचे स्वरूप

सहकारी बँका. नागरी सहकारी बँका आणि खाजगी बँकेकडून ई रिक्षा किमतीच्या 70% कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल

राज्य शासन 20% आर्थिक भार उचलणार

योजनेचे लाभ घेणारा महिलां मुली यांच्यावर 10% आर्थिक भार असणार आहे

कर्ज परतफेड कालावधी पाच वर्ष किंवा 60 महिने

योजना धारकांची पात्रता

1. अर्जदारांचे वय 18 ते 35 वर्ष दरम्यान असावे

2. कोणतही एका बँकेचे बँक खाते असणे आवश्यक

3. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त नसावे

4. गुलाबी रिक्षा योजना लाभार्थी महिला व मुली यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असावे.

5. अर्जदार हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे

आवश्यक कागदपत्रे

1. ऑनलाइन अर्ज करावे

2. अर्जदारांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे आवश्यक

3. महाराष्ट्रात राज्यात असलेले पुरावा

4. अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असावे.

5. बँक खाते पासबुक

6. पासपोर्ट साईज चा फोटो

7. मतदान ओळखपत्र

8. रेशन कार्ड

9. ड्रायव्हिंग लायसन्स.

10. ई रिक्षा ही लाभार्थी महिला किंवा मुली चालवणार आहे याची हमीपत्र असणे आवश्यक

योजनेच्या नियम अटी

1. गुलाबी ई रिक्षा योजनेमध्ये महिला किंवा मुलगी एकदाच लाभार्थी घ्यावे.

2. अर्जदार महिला किंवा मुली यांच्यावर कर्ज नसावे कर्ज परतफेड ची संपूर्ण जबाबदार हे लाभार्थी महिला किंवा मुलगी असेल

3. गुलाबी ई रिक्षा योजनेमध्ये मिळालेली रिक्षा महिला किंवा मुलगी चालवावे

4. गुलाबी ई रिक्षा योजनेमध्ये मिळालेले रिक्षा पुरुषाने चालवताना दिसली तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते .

5. गुलाबी ई रिक्षा योजनेमध्ये मिळाली रिक्षाची देखभाल आणि रिपेरी लाभार्थी महिला किंवा मुलगी यांनी जबाबदारी घ्यावी राज्य शासन कुठलीच मदत करणार नाही

गुलाबी ई रिक्षा योजनांमध्ये अर्ज करण्याची पद्धत

अर्जदार महिलांनी आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी त्यांच्या कार्यालयात जाऊन योजन गुलाबी रिक्षा योजनेसाठी अर्ज करावे या अर्जामध्ये विचारले सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावे

Leave a Comment